Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

ब्राउन प्लँटहॉपर (तुडतुडा) मुळे होणार्याि नुकसानीचे स्वरूप ( Nature of damage for Brown planthopper (Tudtuda)

PrintPrintSend to friendSend to friend

1. छोटे आणि प्रौढ किडे रोपाच्या महत्त्वाच्या भागातून रस शोषतात. तेथे अंडी घालतात, पानाच्या आवरणामधला किंवा मध्यभागातील शिरांतून रस शोषतात आणि तेथे काही विषारी द्रव्ये सोडतात.

2. ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे पाने अकाली पिवळी पडतात आणि मरू लागतात. अखेरीस ते पूर्ण रोपच मरते.

3. रोपे मरण्याची ही क्रिया एकमेकांपासून दूरदूर असलेल्या गोलाकार क्षेत्रांवर झालेली आढळते. अखेरीस ही सर्व क्षेत्रे एकत्र होऊन पूर्ण शेतच मरणार्यान रोपांनी भरून जाते.

4. रोपाच्या तळाशी कीटकांच्या विष्ठेचे मधाच्या रंगाचे व काजळीयुक्त लहान गोळे आढळतात. बाधित देठ मऊ पडतात आणि त्यांचा गवत म्हणूनही वापर करता येत नाही.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
Copy rights | Disclaimer | RKMP Policies