Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

Package of Practices

Package of Practices
3
Jul

వరి యాజమాన్య పద్ధతులు

వరి యాజమాన్య పద్ధతులు

వరి నారుమడి తయారి

చేయదగిన పనులు:

File Courtesy: 
APRRI, Maruteru
3
Jul

महाराष्ट्रातील तांदळावर आधारीत पीकपध्दती

1. तांदूळ-नाचणी
2. तांदूळ-डाळी
3. तांदूळ-ज्वारी
4. तांदूळ-शेंगदाणे
5. तांदूळ-ऊस
6. तांदूळ-तेलबिया इतर

File Courtesy: 
तांदूळ वेळापत्रक
3
Jul

महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचे महत्त्व

1. राज्यामध्ये 174.3 लाख हेक्टर क्षेत्रफळ लागवडीखाली आहे जे एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या सुमारे 80% आहे.
2. सिंचनाखालील एकूण क्षेत्रफळ 29.4 लाख हेक्टर इतके असून ते एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या 17% आहे.
3. ऊस, कापूस, नाचणी, बाजरी, सोयबीन, सूर्यफूल आणि करडई ही प्रमुख पिके आहेत.

File Courtesy: 
तांदूळ वेळापत्रक
3
Jul

महाराष्ट्राचे कृषीपर्यावरणीय विभाग:

राज्याचे खालील कृषीपर्यावरणीय विभाग पाडण्यात आलेले आहेत:
१. कृषीपर्यावरणीय विभाग 1: खूप जास्त पर्जन्यमान, लाल मृदा;
२. कृषीपर्यावरणीय विभाग 2: खूप जास्त पर्जन्यमान, लाल नसणारी मृदा;
३. कृषीपर्यावरणीय विभाग 3: घाट विभाग
४. कृषीपर्यावरणीय विभाग 4: स्थित्यंतर 1, लालकडून लालसर तपकिरी मृदेकडे
५. कृषीपर्यावरणीय विभाग 5: स्थित्यंतर 2, करडी काळी मृदा;
६. कृषीपर्यावरणीय विभाग 6: दुष्काळी विभाग
७. कृषीपर्यावरणीय विभाग 7: निश्चित पर्जन्यमान, मुख्यत्वे खरीप पीक
८. कृषीपर्यावरणीय विभाग 8: मध्यम ते जरा जास्त पर्जन्यमान, शोषक थरांपासून बनवेली मृदा (ट्रॅप सॉइल) असते;

File Courtesy: 
तांदूळ वेळापत्रक
3
Jul

महाराष्ट्र राज्याचा भुगोल

१. महाराष्ट्र 15044’ आणि 2206’ उत्तर अक्षांश आणि 72056’ आणि 80054’ रेखांशांमध्ये आहे.
२. त्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगढ, आग्नेयेस आंध्र प्रदेश आणि दक्षिणेस गोवा व कर्नाटक ही राज्ये वसलेली आहेत.
३. येथील हवामान उष्ण आणि दमट आहे. पर्जन्यमान 762-4000 मिमी या श्रेणीमध्ये असते.

File Courtesy: 
तांदूळ वेळापत्रक
3
Jul

महाराष्ट्र

१. राज्यस्थापनेचा दिनांक: 1 मे 1960
२. जिल्ह्यांची संख्या: 35
३. क्षेत्रफळ: 8,07,713 चौ.किमी
४. गावे: 41,095
५. राजधानी: मुंबई
६. शहरे: 378
७. लोकसंख्या: 96,752,247
८. दरडोई उत्पन्न (सध्याच्या किंमतींनुसार) (2005-06): रु. 37,081

File Courtesy: 
तांदूळ वेळापत्रक
3
Jul

काढणी व झोडपणी

1. ओंबीतील 90 टक्के दाणे गवताच्या रंगाचे झाल्यावर पिकाची काढणी अगदी जमिनीजवळ करतात.
2. काढणी उशीरा केल्याने दाणे फुटून फार नुकसान होते.पक्षी व उंदीर धान्य खातात तसेच तुकडा तांदूळ जास्त निघतो.
3. काढणीची योग्य वेळ म्हणजे ओंब्या पिकून पाने किंचित हिरवी असतानाची. काढणी साधारणतः मजूर लावून विळ्याने करतात किंवा यांत्रिक औजार, स्वयंचलित यंत्रे इ. वापरतात. काढलेले धान्य शेतातच 3-4 दिवस सुकवतात.
4. कंबाइन हार्वेस्टपॅडलचलित थ्रॅशर यंत्राने किंवा यांत्रिक औजाराने करतात.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
3
Jul

एकात्मिक पोषकद्रव्य व्यवस्थापन

1. जास्त उत्पादन मिळवण्यासाठी एकात्मिक पोषकद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा वापर गरजेचा असतो. ह्यामागील तत्त्व असे सांगते की फुटवे येण्याच्या काळातच जास्तीतजास्त खत दिले गेले पाहिजे (70–80%) तर ह्यानंतरच्या टप्प्यावर अगदी थोडे खत द्यावे.
2. खाचरांत पाणी भरण्यापूर्वी 10 tटन/हे शेतातील खत द्यावे. ऐंद्रीय N, P & K च्या जोडीला, नांगरणीपूर्वी किंवा पाणी भरण्यापूर्वी, सेंद्रीय खत (10–15 टन/हे – ताज्या खताचे वजन) दिल्यास फायदा होतो.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
3
Jul

पाण्याचे व्यवस्थापन

1. पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन होण्यासाठी शेत सपाट असावे.
2. पुनर्लावणीपासून शेतात 1–2 सेंमी उंचीचे पाणी भरा. रोपटी व्यवस्थित जगेपर्यंत एवढे पाणी ठेवा (सुमारे 10 दिवसांपर्यंत). त्यानंतर फुटवे येण्यासाठी पाण्याची ही पातळी वाढवून 2–3 सेंमी करा.
3. जास्तीतजास्त फुटवे आल्यानंतर, पाणी काढून टाका म्हणजे अनुत्पादक फुटवे येणार नाहीत आणि रोपांची वाढ एकसमान होईल.
4. हेडिंग तसेच फुलोरा धरण्याच्या काळात 10 सेंमी खोल पाणी ठेवा. दुधाच्या दाण्यांचा टप्पा पूर्ण होईपर्यंत 5 सेंमी पर्यंत पाणी कायम ठेवा.
5. काढणीआधी 10- 15 दिवस शेतातील पाणी काढून टाका.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
3
Jul

पुनर्लावणी

1. 1000 मिमी पेक्षा कमी वार्षिक पाऊस असलेल्या भागांत ह्या पद्धतीचा वापर करावा – उदा. कोकण आणि विदर्भ
2. 35-40 किग्रॅ /हे बियाणे लागते. हायब्रीड जातींसाठी हेक्टरी 20 किग्रॅ बियाणे पुरते. एक हेक्टरावरील पुनर्लावणीसाठी 1000 चौ. मी. क्षेत्राची रोपवाटिका पुरेशी असते.
3. वर सांगितल्याप्रमाणे रोपवाटिका चालवावी. खरीप हंगामात 12 to 15 सेंमी उंचीची, 5-6 पाने असलेली आणि 21-25 दिवस वयाची रोपे पुनर्लावणीसाठी वापरा.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
3
Jul

भाताची थेट पेरणी

1. 1000 मिमी पेक्षा कमी वार्षिक पाऊस असलेल्या भागांत ह्या पद्धतीचा वापर करावा.
2. महाराष्ट्राच्या काही अपारंपारिक भागांत ही पद्धत वापरतात – उदा. मराठवाडा, प. महाराष्ट्र
3. ह्या पद्धतीमध्ये हेक्टरी 80-100 किग्रॅ बियाणे लागते. पेरणीपूर्वी 24 तास बियाण्यावर थायरॅमची प्रक्रिया @ 2 ग्रॅम/किग्रॅ बियाणे ह्या प्रमाणात करा म्हणजे बियाणे तसेच मातीतून पसरणार्याि रोगांना अटकाव होईल.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
3
Jul

चांगल्या बियाण्याची वैशिष्ट्ये

1. बियाण्याची गुणसूत्रात्मक (जेनेटिक) तसेच जातीची शुद्धता असावी, त्यामध्ये वाणांची मिसळ येऊ नये. पिकाचा वाण आणि कालावधी स्थानिक कृषिपद्धतींशी सुसंगत असावा.
2. बियाणे शुद्ध, चांगल्या वाढीचे आणि भरपूर उत्पादन देणारे असावे.
3. बियाणे अंतर्गत रोग आणि किडींच्या संसर्गांपासून मुक्त असावे.
4. बियाणे स्वच्छ असावे; त्यासोबत तणाचे बी किंवा इतर वस्तू नसाव्या.
5. बियाणे पूर्ण स्वरूपात असावे – म्हणजे तुकडे किंवा नुकसान झालेले नको.
6. बियाण्यात योग्य प्रमाणात आर्द्रता असली पाहिजे (8-12 %).
8. बियाण्याच्या उगवणीची टक्केवारी चांगली असावी (80 % पेक्षा जास्त)

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
3
Jul

बियाण्याचा दर्जा

चांगल्या दर्जाचे बियाणे वापरल्याचे फायदे असे -

1. उगवण एकसारखी असते त्यामुळे न उगवलेल्या बियांच्या जागी पुनः पेरणी करावी लागत नाही.
2. रोपट्यांची जोमदार वाढहोत असल्याने त्यांना तण व रोगापासून कमी त्रास होतो..
3. वाढ, परिपक्वता आणि उत्पादनाच्या पातळ्यांमध्ये एकसमानता.
4. साठवणुकीदरम्यानही दर्जा कायम राहतो.
5. स्वच्छ करणे, मानकीकरण (स्टँडर्डायझेशन) आणि निर्जंतुकीकरणास कमी खर्च.
6. एकंदर खर्च कमी होतो.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
3
Jul

डॅपोग पद्धतीची रोपवाटिका

डॅपोग पद्धतीची रोपवाटिका म्हणजे कॉँक्रीटच्या जमिनीवर किंवा पॉलिइथिलीनच्या शीटने झाकलेल्या मातीच्या गादीवाफ्यावर रोपे वाढवणे. जेथे पाण्य्चा खात्रीशीर सोय असेल अशा ठिकाणी ही पद्धत वापरतात.
1. बियाण्याचा वापर: 25-35 किग्रॅ/हे
2. बियाण्यावर प्रक्रिया: कोरड्या बियाण्यावर प्रक्रिया: बियाण्यावर बुरशीनाशकांची – उदा. बॅव्हिस्टिन किंवा थायरॅम 2 ग्रॅम/किग्रॅ बियाणे ह्या प्रमाणात, पेरणीआधी 24 तास, प्रक्रिया करा. त्यानंतर बियाण्यावर ऍझोस्पिरिलम (600 ग्रॅम प्रति हे ह्या प्रमाणात) ची प्रक्रिया करा.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
3
Jul

ओली रोपवाटिका

1. बियाण्याचे प्रमाण: 50-60 किग्रॅ/हे भरड दाण्यांसाठी, 35- 40 किग्रॅ/हे पातळ दाण्यांसाठी and 20 किग्रॅ/हे हायब्रीडसाठी.
2. बियाण्यावर प्रक्रिया: कोरड्या बियाण्यावर प्रक्रिया: बियाण्यावर बुरशीनाशकांची – उदा. बॅव्हिस्टिन किंवा थायरॅम 2 ग्रॅम/किग्रॅ बियाणे ह्या प्रमाणात, पेरणीआधी 24 तास, प्रक्रिया करा. त्यानंतर बियाण्यावर ऍझोस्पिरिलम (600 ग्रॅम प्रति हे ह्या प्रमाणात) ची प्रक्रिया करा.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
3
Jul

कोरडी रोपवाटिका

1. बियाण्याचे प्रमाण: 50-60 किग्रॅ/हे (भरड दाण्यासाठी) 35- 40 किग्रॅ/हे (पातळ दाण्यासाठी) आणि 20 किग्रॅ/हे (हायब्रीडसाठी).
2. बियाण्यावर प्रक्रिया: बियाण्यावर बुरशीनाशकाची प्रक्रिया केली जाते – उदा. बॅविस्टिन किंवा थायरॅम, 2 ग्रॅम/किग्रॅ बियाणे ह्या प्रमाणात, पेरणीआधी 24 तास. ह्यानंतर बियाण्यावर, 600 ग्रॅम प्रति हे ह्या प्रमाणात, ऍझोस्पिरिलिअमची प्रक्रिया करतात.
3. रोपवाटिकेतील वाफा बनवणे: 120 सेंमी रुंद, 15 सेंमी उंच आणि सोयीस्कर लांबीचे गादीवाफे बनवा.त्यांच्याभोवती अर्धा मीटर रुंदीची नाली बनवा ज्यायोगे जादा पाणी वाहून जाईल.
4. पेरणी: प्रक्रिया केलेले बियाणे वाफ्यात एकसारखे लावा..

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
3
Jul

रोपवाटिका व्यवस्थापन

भाताच्या रोपवाटिकेचे विविध प्रकार:
1. कोरडी रोपवाटिका.
2. ओली रोपवाटिका.
3. डॅपॉग पद्धतीची रोपवाटिका.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
3
Jul

दुचाकी ट्रॅक्टरचे फायदे आणि तोटे

दुचाकी ट्रॅक्टरचे फायदे:
1. बहुपयोगी
2. प्राणी किंवा माणसे करू शकतील त्यापेक्षा कठीण परिस्थितीत काम करू शकतो
3. ओल्या तसेच कोरड्या स्थितीत कामे करू शकतो
4. रचना सरळ-सोपी असते
तोटे:
1. खरेदीचा आणि वापरण्याचा खर्च
2. चालकाला कष्ट होतात परंतु आता त्यावर बसण्याजोगी मॉडेल्स मिळू लागली आहेत.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
3
Jul

शेतावरील ऊर्जास्रोतांचे महत्त्व आणि त्यांचे प्रकार

i) पाळीव प्राणी: जमीन तयार करणे, तणाचे व्यवस्थापन, पिकाची उफणणी तसेच ओझी वाहून नेणे ह्या सर्व कामांसाठी प्राणिज ऊर्जा उपयोगी पडते. महाराष्ट्रात शेतीची कामे करण्यासाठी रेडे किंवा बैल सर्वाधिक संख्येने वापरले जातात.
ii) माणसे: जमीन तयार करण्यामधली अनेक कामे मानवी ऊर्जा वापरून केली जातात – उदा. नांगरणी, जमीन सारखी करणे, बंधारे आणि नाल्या बांधणे, झाडे लावणे, किडीचे नियंत्रण, पिकाची काढणी, धान्यावर प्रक्रिया करणे इ
iii) दुचाकी ट्रॅक्टर: जमीन तयार करण्यासाठी दुचाकी ट्रॅक्टर वापरले जातात. ह्यामध्ये नांगरणी, जमीन एका पातळीला आणणे, पाणी उपसणे आणि वाहतुकीचा समावेश दंताळी आणि रोटाव्हेटर्स

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
3
Jul

पाणथळ जमिनी

1. पाणथळ जमिनींसाठी वापरण्याच्या पद्धतीनुसार, भात लावण्यासाठी, खाचरांत मानवी तसेच यांत्रिक उपायांनी पाणी भरून ठेवले जाते.
2. खाचर काळ्या चिकण मातीचे असल्यास अशा पाण्याची पातळी सुमारे 15-20 सेंमी ठेवली जाते.
3. चांगल्या रीतीने पाणी भरले गेल्यास अशी जमीन अतिशय मऊ, तणरहित, एकसमान पातळीची असते आणि तिच्यात पाणी कमी मुरते.
पाणथळ जमिनीसाठी वापरण्याची औजारे

i) देशी नांगर
ii) बोस नांगर
iii) पाणथळ जमिनीत पाणी भरण्याचे उपकरण (वेटलँड पडलर)
iv) केज व्हील
v) सर्पिल पात्यांचे जमिनीत पाणी भरण्याचे उपकरण (हेलिकल ब्लेड पडलर)

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
Syndicate content
Copy rights | Disclaimer | RKMP Policies