Best Viewed in Mozilla Firefox, Google Chrome

Diseases

Diseases
24
Aug

शीथ रॉट रोगाची लक्षणे ( Symptoms of Sheath rot disease)

1. नवीन फुटवे असणार्याे सर्वांत वरच्या पर्णकोशावर रोगाचा परिणाम, काही कालावधीनंतर (लेट बूटिंग स्टेज) होतो.
2. सर्वप्रथम लंबगोलाकार किंवा वेडेवाकडे ठिपके किंवा डाग आढळतात. हे सुमारे 0.5-1.5 सेंमी लांब असतात. त्यांचा मध्यभाग करड्या रंगाचा तर कड गडद लालसर-तपकिरी रंगाची असते.
3. पर्णकोशामध्ये रंग उडालेले लालसर तपकिरी डागही असू शकतात.
4. हे डाग आकाराने वाढत जातात आणि ते एकत्र येऊन संपूर्ण पानावर पसरतात.
5. रोगाच्या गंभीर स्थितीमध्ये नवीन फुटवे संपूर्णपणे किंवा काही प्रमाणात पर्णकोशातच राहतात.
6. पर्णकोशातून बाहेर न आलेले फुटवे कुजून लालसर-तपकिरी किंवा गडद तपकिरी रंगाचे बनतात.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

शीथ रॉट रोग कोणत्या वनस्पतींवर (होस्ट प्लँट) वाढतो ( Host pants Sheath rot disease)

ह्या रोगामुळे ओरिझा सॅटिव्हा L ला आसरा मिळतो. इतर वनस्पती म्हणजे मका, मोतिया बाजरी, ज्वारी, एचिनोक्लोआ कलोना (L.) लिंक (जंगली गवत), एल्युझिन इंडिका (L.) गर्डन. (गूज-ग्रास), लेप्टोक्लोआ चिनेसिस (L.) नीस (रेड स्प्रँगलटॉप), ओरिझा रफिपोगन (लाल भात) आणि झिझेनिया ऍक्वाटिका (वार्षिक जंगली भात).

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

शीथ रॉट रोगाच्या फैलावासाठी अनुकूल स्थिती ( Conditions favourable for Sheath rot disease)

नत्राचे जास्त प्रमाण, जास्त तुलनात्मक आर्द्रता, दाटीवाटीने जोमदार वाढलेले पीक ह्यांमुळे शीथ रॉट रोग पसरतो. ही बुरशी 20 ते 28°से दरम्यान जास्त वाढते.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

शीथ रॉट रोग आढळण्याचा काळ ( Period of occurrence of Sheath rot disease)

भाताच्या पिकाची वाढ पूर्ण होण्याच्या दिवसांत हा रोग महत्त्वाचा ठरतो. ह्यामध्ये साधारणतः सर्वांत वरच्या पर्णकोशावर रोगाचा हल्ला होतो. ह्यामध्येच ओंबी असल्याने तिचे नुकसान होते.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

शीथ रॉट रोग ( Sheath rot disease)

1. कोणत्या जीवाणूमुळे होतो: सारोक्लाडिअम ओरिझी (सावदा) डब्ल्यू गॅम्स आणि डी हॉकस्क

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

फॉल्स स्मट रोगाचे व्यवस्थापन ( Management of False Smut disease)

• पेरणीसाठी रोगमुक्त बियाणे वापरा.
• बियाण्यावर गरम पाण्याची प्रक्रिया करा - 52°से, 10 मिनिटांसाठी.
• शेतातील रोगग्रस्त ओंब्या नष्ट करा.
• बियाण्यावर कार्बेंडाझिम 2.0ग्रॅम/किग्रॅ ची प्रक्रिया करा.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

फॉल्स स्मट रोगामुळे होणार्याय नुकसानीची लक्षणे ( Damage symptoms of False Smut disease)

• एका ओंबीमध्ये ह्या रोगाची लक्षणे दाखवणारे थोडेसेच दाणे असतात.
• ओंबीतील प्रत्येक दाण्याचे रूपांतर मखमली पिवळ्या किंवा हिरवट बीजकण-पिशवीमध्ये (स्पोर-बॉल्स) होते.
• अशा पिशव्यांत व्हाइट मायसेलिअम आणि कोनिडिया प्रकारचे बीजकण आढळतात.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

फॉल्स स्मट रोगासाठी अनुकूल परिस्थिती ( Conditions favourable for False Smut disease)

• कमी तापमान (20°से)
• जास्त तुलनात्मक आर्द्रता (>92%)
• मध्यम प्रमाणात पाऊस, फुलोरा धरताना अधूनमधून हलका पाऊस व स्वच्छ हवा.
• पिकाच्या चांगल्या वाढीच्या व जास्त उत्पादनाच्या हंगामामध्ये हा रोग जास्त आढळतो.
• कोणत्या वनस्पतींवर वाढतो: गवत आणि जंगली भात

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

फॉल्स स्मट रोग ( False Smut disease)

कोणत्या जीवाणूमुळे होतो: उस्तिलाजिनोआयडिया व्हायरेंस (सेke.) ताकाहाशी
स्थानिक नाव:
फॉल्स स्मट हा एक बुरशीजन्य रोग आहे. जास्त पाऊस पडणार्यां वर्षांमध्ये त्याचे स्वरूप जास्त गंभीर बनते. परंतु त्यामुळेच शेतकरी हे चांगल्या हंगामाचे लक्षण मानतात.
उद्भवाचा काळ : ओंब्या दिसू लागणे
उत्पादनाचे नुकसान : अत्यंत कमी, उदा. उडुपी जिल्ह्यात 23% आणि DWR मध्ये 3%
• 1000 ग्रेन-वेट 48% ने
• फोलपटे 40% ने
• रोपाची वाढ
• उगवण 25% ने

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

लीफ स्काल्ड रोगाच्या नियंत्रणासाठी रासायनिक उपाय( Chemical control measures for Leaf Scald disease)

खाचरांमध्ये हा रोग आढळल्यास 0.1% कार्बेंडाझिम द्रावण किंवा 2ग्रॅम मॅन्कोझेब किंवा 2.25ग्रॅम झायनेब 1लिटर पाण्यात मिसळून फवारा.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

लीफ स्काल्ड रोगाच्या नियंत्रणासाठी संवर्धनात्मक उपाय ( Cultural practices to control Leaf Scald disease)

• पेरणीसाठी रोगमुक्त बियाणे वापरा.
• जास्त नत्रयुक्त खताचा वापर टाळा

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

लीफ स्काल्ड रोगामुळे होणार्याळ नुकसानीची लक्षणे ( Damage Symptoms of Leaf Scald disease)

1. पानाच्या टोकापासून तसेच कडांपासून सुरू होणारे फिक्या गहूवर्णी तसेच गडद तपकिरी रंगाचे डाग.
2. पूर्ण वाढीच्या पानांवरचे हे डाग लांबट आकाराचे असतात व त्यांचेभोवती फिक्या तपकिरी रंगाची प्रभावळ असते.
3. प्रत्येक डाग सुमारे 1-5 सेंमी लांब आणि 0.5-1 सेंमी रुंद असतो किंवा तो संपूर्ण पानावरही पसरलेला असू शकतो
4. हे डाग सतत वाढत गेल्याने पानाचा एकंदरीने बराच भाग प्रभावित होतो
5. बाधित भाग कोरडा पडतो व त्यामुळे पान जळाल्याप्रमाणे दिसते
6. पानाचे टोक व कडा अर्धपारदर्शक बनतात

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

लीफ स्काल्ड रोग ( Leaf Scald disease)

1. कोणत्या जीवाणूंमुळे होतो : मोनोग्राफेला अल्बेसिन्स.

2. उद्भवण्याचा काळ: फुटवे येत असताना तसेच खोडाची लांबी वाढत असताना.

3. उत्पादनाचे नुकसान: भारतात ह्या रोगामुळे उत्पादनाचे 20-30% नुकसान होत असल्याचे आढळते.

4. पूरक जीवाणू: ही बुरशी ह्या जीवाणूंमुळेही पसरते – एचिनोक्लोआ क्रस-गलि (L.) पी. बीव्ह्. (कॉक्सपर) तसेच ओरिझा सॅटिव्हा लि. (तांदूळ).

5. फैलावाचे मार्ग -

6. उद्भवाचे स्रोत: बियाणे आणि पूर्वीच्या पिकाची खोडे.0

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

ब्राउन लीफ स्पॉट रोगाच्या नियंत्रणासाठी रासायनिक उपाय ( Chemical control of Brown leaf spot)

• खाचरांमध्ये हा रोग आढळल्यास 2ग्रॅम मॅन्कोझेब किंवा 2.25ग्रॅम झायनेब 1लिटर पाण्यात मिसळून फवारा.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

ब्राउन लीफ स्पॉट रोगासंबंधीचे संवर्धनात्मक उपाय ( Cultural practices of Brown leaf spot)

1. पेरणीसाठी रोगमुक्त बियाण्याचाच वापर करा.

2. जास्त नत्रयुक्त खतांचा वापर टाळा.

3. रोगाला विरोध करू शकणारी जात लावा – उदा. अमृत.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

ब्राउन लीफ स्पॉट रोगामुळे होणार्याो नुकसानीची लक्षणे ( Damage symptoms of Brown leaf spot)

1. ह्या रोगाची लक्षणे कोलिओप्टाइल, पाने, पर्णकोष आणि ग्लुम्सवरही दिसतात.

2. पानांवरील डागांच्या आकारात फरक असू शकतो (1सेमी). ते छोट्या ठिपक्यापासून गोलाकार डागांपर्यंत, डोळ्याच्या आकाराचे किंवा मध्यभागी लंबगोलाकार डाग असलेलेही असू शकतात.

3. कधीकधी बियाणे सुरकुतलेले आणि रंग उडालेले असू शकते.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

ब्राउन लीफ स्पॉट रोगाची अधिक माहिती ( Details of Brown leaf spot disease)

उद्भवण्याचा काळ: रोपट्यांपासून पूर्ण वाढलेल्या पिकापर्यंत
उत्पादनाचे नुकसान: अतिगंभीर प्रकरणांत 50-90%
पूरक जीवाणू (सेollateral hosts): डिजिटॅरिया सँग्विलॅनिस लीरसिया हेक्झांड्रा, एचिनोक्ला कलोना, पेनिसेटम टायफॉइडस,सेटारिया इटॅलिका, सिनॅडॉन डेक्टिलॉन.
जीवाणूच्या वाढीसाठी योग्य परिस्थिती
• तापमान 25-30°से
• तुलनात्मक आर्द्रता (>90%)
• जोरदार व उशीरा होणारा ईशान्य मोसमी पाऊस
• दिवसा ढगाळ हवा
• नत्राची जास्त मात्रा
फैलावाचे मार्ग: वारा
रोगाच्या उद्भवाचे स्रोत: बियाणे, पूरक जीवाणू, भातपिकाचे गवत किंवा राहिलेले खुंट

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

ब्राउन लीफ स्पॉट - Brown leaf spot

1. कोणत्या जीवाणूमुळे होतो: हेल्मिंथोस्पोरियम ओरिझी
2. स्थानिक नाव:

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

शीथ ब्लाइट डिसीझ (पर्णकरपा) च्या नियंत्रणाचे रासायनिक उपाय- Chemical control for Sheath Blight disease ( Parnkarpa)

• बुरशीनाशकांची फवारणी – 1 लिटर पाण्यात 1ग्रॅम कार्बेंडाझिम 50WP (540ग्रॅम/एकर) किंवा 2.0 ग्रॅम मॅन्कोझेब 75WP किंवा 1मिलि हेक्झाकॉँझोल मिसळणे.

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
24
Aug

शीथ ब्लाइट डिसीझ (पर्णकरपा) च्या नियंत्रणाचे संवर्धनात्मक उपाय- Cultural Practices to control Sheath Blight disease ( Parnkarpa)

• रोगग्रस्त बियाणे वापरू नका.
• नत्राचे ('N') प्रमाण मध्यम ठेवा (80-100 किग्रॅ/हे). खत 3-4 वेळा विभागून द्या.
• जास्त 'N' देणे टाळा, रोगग्रस्त खाचरांमध्ये 'N' ची अखेरची मात्रा देऊ नका.
• कचरा / तण इ. नष्ट करा.
• तपकिरी तुडतुड्यांची संख्या आटोक्यात ठेवा

File Courtesy: 
आरएआरएस कर्जत
Syndicate content
Copy rights | Disclaimer | RKMP Policies